सहकारी बंधू आणि भगिनींनो..!💐

युनियन तर्फे देण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार उद्या दि. २१.०५.२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता वसुधरा भवन येथे आपल्याला मोठ्याप्रमाणत उपस्थितीत राहावयाचे आहे. स्ट्राईक कॉल असल्याने प्रत्येकाने ड्रेस कोड फॉलो करावयाचा आहे. ड्रेस कोड मध्ये काळ्या रंगाचे शर्ट(Black Shirt)/ काळ्या रंगाची टीशर्ट(Black T-shirt) किंवा गडद रंगाचा ड्रेस(Dark colors dress) असणे आवश्यक आहे. कोणीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून येऊ नये अशी सूचना युनियन कडून करण्यात येत आहे कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी..

जो पर्यंत व्यवस्थापणेकडून आलेली ऑफिस ऑर्डर रद्दबातल होत नाही तो पर्यंत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तीच्या स्ट्राईक कॉल वर ठाम आहे व ती मागे सरणार नाही हे याद्वारे आपणास स्फूर्तपणे कळविण्यात येत आहे..!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई🚩🚩

🏴🏴 STRIKE STRIKE STRIKE.. 🏴🏴

होय या अन्यायाविरोधात..!
होय या जाचक नियमाविरोधत..!
होय या हुकूमशाही विरोधात..!
होय चुकीच्या धोरणाविरोधात..!

आता नाही तर कधीच नाही..!!

सर्व कामगार बांधवांना विनंती जर आपण ऑफ मध्ये आहात तर मंगळवार, बुधवार व शुक्रवार स्वयंस्फूर्तीने ह्या एकाधिकारशाही लादू पाहणाऱ्या व्यवस्थापना विरोधात एकत्र या आणि आपल्यावर होणारा हा अन्याय मोडीत काढण्यासाठी आपण सर्व सामील व्हा..! या मुजोर व्यवस्थापनाला आपली जागा दाखवण्याची हीच अचूक संधी व वेळ आहे..!!!

सर्व मतभेद विसरा फक्त एकच लक्षात ठेवा आपला अधिकार..!!

जन आक्रोश..!👊
जन प्रक्षोभ..!!👊

आता फक्त एकच ध्येय, जन आंदोलन आपल्या हक्कासाठी..!!!

कामगार विरोधी व्यवस्थापने विरुद्ध होत असलेल्या ह्या जनआंदोलनात जास्तीत जास्त संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे असे आव्हान पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन या द्वारे करते आहे..

🙏🏻पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन 🙏🏻
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई🚩🚩🚩🚩🚩

भाइयों और बहनों💐

आज 17.05.24 को प्रबंधनद्वारा ऑफशोर में मानसून के दौरान हेलीकॉप्टर संचार सेवाओं को कम करने के उद्देश्य से ऑफशोर में कार्यरत सभी कर्मचारियों के लिए मौजूदा 14 दिनों के ऑन-ऑफ ड्यूटी पैटर्न को 21 दिनों के ऑन-ऑफ ड्यूटी पैटर्न में बदल देणे के संबंध मे एकतरफा ऑफिस ऑर्डर प्रस्तुत किया है।

इससे पहले इस संबंध में 07.05.2024 को मुख्य-कर्मचारी संबंध (चीफ-ईआर) के साथ हुई बैठक में पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन की ओर से कड़ा विरोध जताया गया था। इस लिए घबराने की कोई बात नहीं है, क्योंकि पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आपको आश्वस्त करना चाहता है कि वह आज भी अपने रुख पर कायम है।

आपको सूचित किया जाता है कि, यदि प्रबंधनद्वारा बलपूर्वक ड्यूटी पैटर्न को बदलने का प्रयास किया जाता है, तो पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन उक्त प्रयास को विफल कर देगा और बिना चेतावनी के श्रमिक विरोधी नीतियों को लागू करने के प्रबंधन के रुख का कड़ा विरोध कर इसके ख़िलाफ़ कडा आंदोलन करने की चेतावनी देता है।

कृपया सभी ध्यान दे कि, इस संबंध में अधिक जानकारी और रचनात्मक नीति जलदी ही पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन द्वारा प्रस्तुत की जाएगी।

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यू, ओएनजीसी, मुंबई 🚩🚩


बंधू आणि भगिनींनो💐

आज दि.१७.०५.२४ रोजी आस्थापणेने ऑफशोअर मध्ये मॉन्सून काळात हेलिकॉप्टर दळणवळण सेवा कमी करण्याच्या उद्देशाने, ऑफ़शोअर मध्ये रुजू असलेल्या सर्वच एम्प्लॉईजचा सध्या सुरू असलेला १४ दिवसांचा ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न बदलून मॉन्सून काळात २१ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न राबविण्याबाबतची एकतर्फी ऑफिस ऑर्डर काढली आहे.

या आधी ०७.०५.२०२४ रोजी मुख्य-कामगार संबंध (CHEIF – ER) यांच्या सोबत पार पडलेल्या बैठकी मध्ये यासंदर्भात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने ठामपणे विरोध दर्शविला होता. आजही पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तिच्या भूमिकेवर ठाम असल्याचे आपणास आश्वस्त करू इच्छिते म्हणून आपण घाबरून जाण्याचे कारण नाही.

जोर-जबरदस्ती करून जर अशा प्रकारे ड्युटी पॅटर्न बदलविण्याचा प्रयत्न आस्थपणेकडून होत असेल तर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सदर प्रयत्न हाणून पाडेल व त्याविरुद्ध उग्र आंदोलनाचा बडगा उगारून तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा वजा आस्थापणेच्या कामगार विरोधी धोरणं राबविण्याच्या भूमिकेचा कडाडून विरोध करत आहे असे आपणास याद्वारे कळविण्यात येत आहे.

यासंदर्भात पुढील माहिती व कृतिशील धोरण पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन लवकरच मांडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी,मुंबई🚩🚩.

बंधू आणि भगिनींनो,

आज दिनांक. ०७/०५/२०२४ रोजी ग्रीन हाईट येथे चीफ ER श्री.अस्थाना साहेब यांच्या कार्यालयात मुंबई येथे तातडीची बैठकी आयोजित करण्यात आली होती.

सदर मीटिंग मध्ये अस्थापणेने ऑफशोअर मध्ये मॉन्सून काळात असलेले हेलिकॉप्टर दळणवळण कमी करण्याच्या उद्देशाने सध्या असलेला १४ दिवसांचा DUTY PATTERN बदलून स्टाफ एम्प्लॉइज करिता मॉन्सून काळात २१ दिवस करण्याकरिता युनियन ची परवानगी मागण्याचा प्रयत्न केला.

ही बाब समजल्यावर २१ दिवसांकरिता असलेली ही सर्व हालचाल आपल्या सर्व नियम व पॉलिसी च्या विरोधात असून अश्या पॅटर्न करिता आपला ठाम विरोध असल्याचे तसेच केवळ सुरक्षिततेचे कारण पुढे करीत अश्या प्रकारचा DUTY PATTERN बदलणे अवाजवी व आधीच दडपणाखाली असलेल्या आपल्या एम्प्लॉइज करिता अजुन शारीरिक आणि मानसिक दडपण टाकण्या सारखे आहे.

तसेच यापूर्वी झालेल्या विवध हेलिकॉप्टर अपघातां करिता कोणत्याही प्रकारे WEATHER CONDITION जबाबदार नव्हती याचा देखील खुलासा केला.

आणि जोरजबरदस्ती अश्या प्रकारचे पॅटर्न बदलल्यास आपण उग्र आंदोलनाचा बडगा उगारून या भूमिकेचा कडाडून विरोध करू असे ठणकावण्यात आले.

ऑफशोअर मध्ये आपणही असे कोणतेही प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित युनियनशी संपर्क साधावा.

पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
WOU, मुंबई.

बंधू आणि भगिनींनो,
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मान्यता प्राप्ती नंतर लगेचच ऑफशोअर आणि ऑनशोअर कामगारांच्या असलेल्या विविध समस्यांवर चर्चे करिता bilateral मीटिंग ची मागणी आपल्या पत्राद्वारे करण्यात आली होती.

आपल्या माहितीप्रमाणे जवळ जवळ १४ वर्षं अश्या प्रकारची मीटिंग यापूर्वी कधीच झाली नसल्याने आणि पहिल्यांदाच आपण अश्या प्रकारे मीटिंग केल्याबद्दल आस्थापनेचे देखील धाबे दणाणले.

आज दि.०४/०५/२०२४ रोजी WOU च्या सर्व KEY EXECUTIVES बरोबर ही बैठक संपन्न झाली, ज्यामध्ये श्री.C. MATHAVAN साहेब ED WOU Mumbai, श्री.V V प्रसाद ED CDS, श्री.अजय कुमार शर्मा ED ASSET MANAGER MH ASSET, श्री.रवी शंकर ED ASSET MANAGER B&S, श्री.अमित देसाई ED HDS, श्री.B C GOEL GGM HEAD RO MUMBAI, I/C MEDICAL श्री शेनॉय साहेब हे उपस्थित होते ज्यामध्ये आपल्या दिलेल्या ऑफशोअर मधील व वर्क सेंटर(ऑफिसेस) संदर्भातील SAFETY व इतर वेल्फेअर च्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

गेल्या १४ वर्षांमधील प्रलंबित असलेल्या विषयांवर अस्थपनेन आश्चर्य व्यक्त केले व आपल्या पत्रा मधील व इतर जवळ जवळ ८० विषयांवर सकारात्मक चर्चा करून विषय लवकरात लवकर सोडविण्याचे मान्य केले. तसेच झालेल्या सर्व विषयांवर लवकरच MINUTES प्रकाशित करण्यात येतील.

कामगार एकता जिंदाबाद!!!
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन जिंदाबाद!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व जनरल एम्प्लॉइज असोसिएशन आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिन!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व जनरल एम्प्लॉइज असोसिएशन तर्फे दि. ०१/०५/२०२४ रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन सोहळा ११ हाय कार्यालय, तळ मजला ATRIUM, ONGC, सायन येथे सकाळी ठीक ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या सर्वांची पारंपरिक पेहरावात उपस्थिती हीच आपल्या या कार्यक्रमाची शान आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या या एकजुटीचे आणि कामगारांच्या ताकदीचे दर्शन या कार्यक्रमाच्या स्वरूपात सर्वांना घडूद्या व त्याकरिता आपणा सर्वांना विनंती आहे आपण मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहवे व आपल्या मौल्यवान वेळ याकरिता द्यावा.

विशेष आकर्षण:
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पथक यांचे शिवकालीन साहसी खेळ.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन व जनरल एम्प्लॉइज असोसिएशन.
WOU, मुंबई.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🙏बंधू आणि भगिनींनो,🙏

मुंबईहुन महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांसाठी फक्त star Air ची विमान वाहतुक सेवा कार्यान्वित आहे. SBT मध्ये Star Air चा पर्याय उपलब्द नसल्यामुळे on/ off करणाऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येत नव्हता. Petroleum Employees Union च्या सतत च्या पाठपुराव्याला यश आले असुन Star Air चा बुकींग option SBT मध्ये उपलब्द झाला आहे आणि लवकरच SBT च्या site च्या upgradation नंतर तो Option site वर दिसु लागेल व महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून , जिथे फक्त star Air ची सुविधा उपलब्द आहे, तिथुन on/off करणाऱ्या कामगार बंधु भगिनींना या सेवेचा निश्चित लाभ होइल.

  

आपला,
संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई,WOU.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

“May the teachings of Lord Mahavir inspire us to lead a life of compassion, non-violence, and righteousness.

Wishing you and your loved ones a blessed Mahavir Jayanti filled with peace, harmony, and spiritual enlightenment.”

🙏🚩Team PEU 🚩🙏

रु.४०,०००/- पेक्षा कमी बेसीक असलेल्या कामगार बंधु / भगिनींना अर्धाच CPP मिळत होता, Petroleum Employees Union ने हा कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवुन कामगारांना आर्थिक लाभ मिळवून दिला, त्या बाबत अनेकांनी मनापासून PEU चे आभार व्यक्त केले , त्यातील काही आभारपत्रे:

For awareness of all:

ऑफशोअर मधील कामगारांकरिता महत्त्वाची सूचना!!

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऑफशोअर करिता CREW BOAT द्वारे पॅसेंजर वाहतूक सुरुवात ONGC कडून करण्यात आली आहे, परंतु सदर व्यवस्था ही CONTRACTUAL WORKFORCE करिता असून ओएनजीसी एम्प्लॉइज करिता नाही आणि ONGC एम्प्लॉइज करिता कोणतीही अधिकृत चर्चा पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन बरोबर करण्यात आलेली नाही.

ONGC EMPLOYEES करिता अश्या TRANSPORTATION करिता पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियनचा ठाम विरोध आहे आणि सर्व एम्प्लॉइज ना विनंती आहे की आपण कोणीही कोणत्याही दबाव अथवा भूलथापांना बळी पडू नये आणि आपली भूमिका स्पष्ट आणि ठाम ठेवू आणि पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन बरोबर खंबीरपणे उभे राहावे.

संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई, WOU.

🚩🙏 धन्यवाद 🙏🚩

🙏बंधू आणि भगिनींनो,🙏

ऑफशोअर मध्ये कार्यरत असलेल्या व महाराष्ट्राच्या विविध भागातून ऑफशोअर ड्यूटी करिता जाणाऱ्या बांधवांकरिता आपल्या दी.१०/१०/२०२३ व ०१/११/२०२३ रोजी च्या पत्रा अन्वये हेलिबेस येथे फ्रेश अप- चेंजींग रूम तसेच हेलिबेस येथे reporting नंतर उशिरा Sortie असल्यामुळे हेलिबेस येथे थांबून ऑफशोअर ला गेल्यावर नाईट शिफ्ट जॉईन करणाऱ्या बंधू आणि भगिनींना हेलीबेस येथे रेस्ट रूम करिता सुविधा उपलब्ध करण्याकरिता आपण मागणी केली होती व त्यानंतरही सतत त्याचा पाठपुरावा चालू ठेवला होता, ज्याची पूर्तता व्हायला सुरुवात झाली असून अस्थपणेने प्राथमिक स्वरूपात हेलिबेस येथे टीव्ही जवळ रूम क्रमांक.२ येथे तात्पुरते फ्रेश अप व चेंजिंग सुविधा सुरू केली आहे, तसेच आज आपले जनरल सेक्रेटरी श्री.संतोष पाटील साहेब व DGS. श्री संदीप रेवंडकर साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांसह भेट देऊन सध्या दिलेल्या सुविधे मध्ये काही बदल करण्याकरिता सूचना दिल्या असून सदर तात्पुरते स्वरूपाची सुविधा ही अजुन चांगली करून सुचविलेल्या नवीन ठिकाणी सुसज्ज स्वरूपात करण्या बाबत चर्चा केली व अस्थापनेकडून देखील ते मान्य करण्यात आले आहे.

ही सुविधा देखील लवकरच सुरू करण्याचे मान्य केले आहे.

🚩आपले पाठबळ हीच ताकत !!!🚩

आपला,
संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई,WOU.


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩